Srujan Book Logo_3

आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी

सृजन विचारांना खोली आणि आकलनाला विस्तार देते

Book_A1

सखोल, समृद्ध आणि चिकित्सक आशय

साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, समाजकारण आणि समकालीन वास्तव यांचा बहुआयामी व चिकित्सक दृष्टिकोनातून वेध घेणारे दर्जेदार लेखन.

सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवांचा संगम

चांगले साहित्य, अर्थपूर्ण कला आणि परिवर्तनशील विचार यांना व्यासपीठ देत समाजातील दुर्लक्षित अनुभव व नव्या जाणिवांना अभिव्यक्ती देणारे सांस्कृतिक माध्यम.

विचारवंत, लेखक आणि वाचकांना जोडणारा मंच

संवाद, चिंतन आणि आत्मपरीक्षणाला प्रोत्साहन देत वाचक, लेखक, कलाकार आणि विचारवंत यांच्यात मुक्त सांस्कृतिक संवाद निर्माण करणारा समृद्ध अवकाश.

Srujan Book Logo_4

आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी

कला, साहित्य आणि समाज यांना वाहिलेले हे एक समकालीन सांस्कृतिक त्रैमासिक आहे. चांगले साहित्य, अर्थपूर्ण कला आणि चिकित्सक विचार समाजाला अधिक मानवी बनवतात. सृजन केवळ लेखन प्रकाशित करत नाही; ते संवाद घडविण्याचा प्रयत्न करते, प्रश्न विचारते आणि आकलनाच्या नव्या वाटा शोधते.

साहित्य, सिनेमा, चित्रकला, संगीत, संस्कृती, इतिहास, समाजकारण आणि समकालीन वास्तव यांचा येथे सखोल वेध घेतला जातो. मुख्य प्रवाहाच्या गदारोळापलीकडील विचार, दुर्लक्षित अनुभव आणि परिवर्तनशील जाणिवांना इथे मंच मिळतो.

सर्जनशीलता, समता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही मूल्ये आणि मानवी संवेदना या मूल्यांशी आमची बांधिलकी आहे. प्रत्येक अंक हा केवळ वाचनाचा नाही, तर चिंतनाचा आणि अनुभूतीचाही नवा प्रवास असतो.

वाचक, लेखक, कलाकार आणि विचारवंत यांना जोडणारा हा एक मुक्त सांस्कृतिक अवकाश आहे. आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी, नव्या दृष्टीचा शोध घेण्यासाठी आणि काळाशी संवाद साधण्यासाठी; ‘सृजन’ सदैव आपल्या सोबत आहे.

Main Cover_Srujan

अभिप्राय

Srujan Book Logo_3

आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी