आमच्या विषयी
आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी
‘आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी’ या ध्येयवाक्याला केंद्रस्थानी ठेवून सृजन प्रकाशन साहित्य, विचार आणि ज्ञान व्यवहार यांच्यात अर्थपूर्ण संवाद घडविण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासाठी प्रकाशन हा केवळ व्यवसाय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीचा भाग आहे.
दर्जेदार पुस्तके, वैचारिक त्रैमासिक आणि चिकित्सक लेखनाद्वारे वाचन, चिंतन आणि सांस्कृतिक भान समृद्ध करणे, हे आमच्या कार्याचे केंद्र आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला समजून घेण्याची दृष्टी देणारे माध्यम आहे, असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही संदर्भमूल्य, अभ्यासपूर्णता आणि वैचारिक प्रामाणिकता जपणाऱ्या साहित्याला प्राधान्य देतो.
कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, आत्मकथन, चरित्र, संशोधन, अनुवाद आणि समकालीन प्रश्नांवरील लेखन अशा विविध साहित्यप्रकारांद्वारे आम्ही लेखक, वाचक आणि संशोधक यांना जोडणारा एक स्वतंत्र साहित्यिक व वैचारिक मंच उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत.
‘सृजन’ त्रैमासिक हा या प्रयत्नाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक अंकामधून समकालीन प्रश्नांकडे विविध दृष्टिकोनांतून पाहण्याची, संवादाची आणि नव्या आकलनाची संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आमचा विश्वास आहे की समाजात विचारांची देवाणघेवाण, चिकित्सक दृष्टी आणि वाचनसंस्कृती अधिक समृद्ध झाली तर सांस्कृतिक जीवन अधिक सक्षम होईल. त्यामुळे लोकशाही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनेल. त्या विश्वासातूनच सृजनचा प्रत्येक उपक्रम आकार घेत आहे.
दृष्टिकोन
मराठीत चिकित्सक वाचनसंस्कृती, वैचारिक संवाद आणि सांस्कृतिक जाण समृद्ध करणारे विश्वासार्ह साहित्यिक व वैचारिक मंच म्हणून विकसित होणे.
ध्येय
दर्जेदार पुस्तके, वैचारिक त्रैमासिक आणि चिकित्सक लेखनाद्वारे वाचन, चिंतन आणि सांस्कृतिक भान समृद्ध करणे; तसेच लेखक, वाचक आणि संशोधक यांना जोडणारा स्वतंत्र साहित्यिक व वैचारिक मंच उभारणे.
मूल्याधिष्ठान
वैचारिक प्रामाणिकपणा
सामाजिक जबाबदारी
वाचनसंस्कृती | संवाद
विजय जाधव
संस्थापक-संपादक | सृजन प्रकाशन
विजय जाधव हे सृजन प्रकाशनचे संस्थापक-संचालक आहेत. त्याशिवाय संपादक, लेखक, अनुवादक, प्रकाशक आणि सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय आहेत.
सृजन प्रकाशनची स्थापना त्यांनी एका स्पष्ट भूमिकेतून केली. विचारप्रधान, परिवर्तनवादी आणि समाजाभिमुख साहित्य अधिक व्यापक वाचकांपर्यंत पोहोचावे, हा त्या प्रयत्नामागील मूलभूत हेतू आहे.
सृजन प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी वैचारिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी आशयाची पुस्तके, विशेषांक आणि विविध प्रकाशने वाचकांसमोर आणली आहेत. नव्या लेखकांना मंच उपलब्ध करून देणे, अर्थपूर्ण वैचारिक लेखनाला प्रोत्साहन देणे आणि मराठी वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
प्रकाशन हा त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नाही; ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे. जनप्रबोधन, विवेकनिष्ठ विचार आणि परिवर्तनशील साहित्य यांचा प्रसार, हेच त्यांच्या प्रकाशन उपक्रमामागील प्रमुख प्रेरणास्थान आहे.
अमरनाथ सिंग
कार्यकारी संपादक | सृजन
अमरनाथ सिंग हे ‘सृजन‘ या मराठी त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. लेखक, अनुवादक आणि माहितीपट दिग्दर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत. विविध दैनिके, नियतकालिके आणि वेबपोर्टल्ससाठी ते नियमित लेखन करतात.
कामगार चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जवळपास एक दशक, तर कलाकार आणि सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून आणखी एक दशक त्यांनी सक्रिय काम केले आहे. सामाजिक चळवळी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि जीवनानुभव यांतून त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनाची जडणघडण झाली. साहित्य, समाज, संस्कृती, राजकारण आणि इतिहास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय आहेत.
लघुपट आणि माहितीपटांच्या निर्मितीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ज्येष्ठ श्रमिक नेते डॉ. बाबा आढाव यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित ‘सत्यशोधक समाजवादी’ या माहितीपटाचे ते लेखक आणि दिग्दर्शक आहेत. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये ते लेखन करतात.
सृजन सहभाग
अनघा लेले
राम जगताप
सुनील तांबे
दीपक कसाळे
छाया दातार
साहिल कबीर
रीतामणि वैश्य
अक्षय शिंपी
श्रीकांत ढेरंगे
युनूस खान
देवदत्त राजाध्यक्ष
नम्रता फलके
देवकुमार अहिरे
दत्ता चव्हाण
कामिल पारखे
अजीम नवाज राही
जसिंता केरकेट्टा
भरत यादव
अशोक शहाणे
माया पंडित
गुरुदत्त सोनसुरकर
गिरीश सामंत
प्रथमेश पाटील
श्रीधर तिळवे नाईक
प्रणव सखदेव
अनिल जायभाये
विवेक घोटाळे
दिगंबर
सुधाकर शेलार
सुनील गजाकोश
कलीम अज़ीम
नितीन ब्रह्मे
राजीव देशपांडे
सुरेन्द्र पाटील
ऐश्वर्या रेवडकर
वर्षा चोबे
गणेश मतकरी
अमोल उदगीरकर
माधुरी दीक्षित
गंधार पारखी
गौरी जानवेकर
उत्पल व. बा.
किशोर मांदळे
श्रीनिवास हेमाडे
संजय मेणसे
सचिन गरुड
प्रज्ञावंत देवळेकर
विजय सावंत
तेमसुला आओ
निसीम बेडेकर
चंद्रकांत बाबर